Ad will apear here
Next
उपासनी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सांधेरोपण सुविधा
अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
उपासनी हॉस्पिटलमधील रोबोटिक सांधेरोपण केंद्राचे उद्घाटन अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. तेजस उपासनी, डॉ. विनोद लाहिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : येथील उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, नुकतेच या केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजचे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी उपस्थित होते.  

या वेळी अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रातील या महत्त्वाच्या बदलाने आयुष्य वाढवले आहे. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे गंभीर आजारांवरही मात करणे शक्य झाले आहे.’ 

‘रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया ही पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे,’ असे अस्थिरोगतज्ञ आणि उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख डॉ. तेजस उपासनी म्हणाले.


‘या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दोन ते तीन दिवसात घरी जाऊ शकतो. यामुळे रुग्णालयात राहण्याचा खर्चदेखील कमी होतो, तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. शस्त्रक्रियेनंतरचा त्रासही खूप कमी असतो. त्यामुळे रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच आहे,’ असेही डॉ. उपासनी यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZIOBX
Similar Posts
२६:११ ऑपरेशन मुंबई ‘२६-११ : ऑपरेशन मुंबई’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
चित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट... ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या सात मे रोजी मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा
‘बाहुबली’ येतोय वेबसीरिजमध्ये मुंबई : दिग्दर्शक राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट दक्षिणेत जसा गाजला, तसाच बॉलीवूडमध्येही या चित्रपटाने धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता ‘बाहुबली’ची वेबसीरिज येत आहे. विशेष बाब म्हणजे मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी या वेबसीरिजमधील एक कलाकार असेल.
‘‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे समाजाच्या संवेदना मांडणारे पुस्तक’ मुंबई : ‘पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकातून समाजाच्या संवेदना प्रकट होत आहेत. ज्यातील शब्द, घटना, चित्रे आणि अक्षरेही बोलतात, असे हे अनोखे पुस्तक आहे. लेखन, चित्रकला आणि सुलेखनकला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झाला आहे. शिवाय हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपातही उपलब्ध

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language